विजय पांढरे यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

vijay-pandhare awaz aapki

७०००० कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा उघड करणारे सिंचन अधिकारी विजय पांढरे हे आज नाशिक येथे आम आदमी पार्टीत प्रवेश करणार आहेत. नाशिक येथील सम्राट हॉटेलमध्ये दुपारी एक वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया आणि संजीव साने या आम आदमी पार्टीच्या नेत्यांसोबत विजय पांढरे सहभागी होणार आहेत.

सिंचनाच्या नावाखाली हजारो कोटी रुपये कंत्राटदारांच्या घशात घालणाऱ्या या घोटाळ्याला सर्वप्रथम वाचा फोडली ती आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया यांनी. या घोटाळ्याचे तपशील दडवून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न होता. परंतु सिंचन विषयातील तज्ञ असणाऱ्या विजय पांढरे या प्रामाणिक अधिकाऱ्याने सरकारचा हा डाव उधळून लावत सर्व तपशील जनतेसमोर आणले. सरकारी अधिकारी म्हणून काम करताना येऊ घातलेल्या राजकीय दबावाची पर्वा न करता पांढरे यांनी केलेला हा खुलासा म्हणजे देशासमोर ठेवलेला आदर्शच आहे.

३० नोव्हेंबर हा त्यांच्या सरकारी नोकरीचा अखेरचा दिवस होता. त्या जबाबदारीतून मुक्त झाल्यांनतर राजकारणाची मलीन प्रतिमा स्वच्छ करण्याच्या कामात स्वतः सहभागी होण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. सिंचन घोटाळ्यातील खरे गुन्हेगार समोर आणून जनतेच्या एकेक रुपयाची वसुली करण्याचे काम विजय पांढरे यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीतर्फे हाती घेण्यात येईल.

Share this:

PinIt
Top